खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल .. ‘ते’ प्रकरण भोवलं
सोलापूर : खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. संजय राऊत यांच्या पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणी पीडित मुलीचा फोटो ट्विट केल्याने ते अडचणीत आले आहेत. या ट्विटमुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे..
मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला
आरोपी मोकाट आहेत.@Dev_Fadnavis pic.twitter.com/E5Bef1sDPb— Sanjay Raut (@rautsanjay61) March 18, 2023