परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं यादेशाचं दुसरं दुर्दैव काय … सावरकर अवमान प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

सावरकरांच्या अवमान प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले कि, राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करावा तितका थोड़ा आहे, ते वारंवार सावरकरांचा अवमान करत आहेत. त्यांची सावरकर होण्याची लायकी नाही, अशा थेट शब्दात शिंदे यांनी निषेध व्यक्त केला.

एकनाथ शिंदे म्हणाले कि, राहुल गांधींच्या कृत्याचा आणि त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. सगळ्यांनीच त्यांचा निषेध करायला हवा. ज्यांनी सावकारांचा अवमान केला, ते वारंवार सांगत आहेत कि, मी सावरकर नाही, मी गांधी आहे. पण सावरकर होण्याची तुमची ;लायकी नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही, मग तुम्ही सावरकर कसं काय होऊ शकता? सावरकर व्हायला त्याग आणि देशाबद्दल प्रेम असायला हवं.
शिंदे पुढे म्हणाले कि, तुम्ही तर परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं यादेशाचं दुसरं दुर्दैव काय असू शकत. तुम्ही देशाची लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी परदेशात जाऊन बोलत आहात. आपल्या देशात एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप कारण, हे आपण समजू शकतो. पण आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणं , याचीही निंदा करावी तेवढी कमी आहे. खऱ्या अर्थाने हा एकप्रकारे देशद्रोहच आहे, असे शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले कि , मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये याप्रकरणी तीव्र असंतोष आहे. म्हणूनच शिवसेना आणि भाजप मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत. त्यासारख्या त्यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात हि यात्रा करणार असल्याचे शिंदे म्हणाले.