खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल .. ‘ते’ प्रकरण भोवलं

10

सोलापूर : खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. संजय राऊत यांच्या पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणी पीडित मुलीचा फोटो ट्विट केल्याने ते अडचणीत आले आहेत. या ट्विटमुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शीमध्ये काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या मुलीचा फोटो राऊत यांनी ट्विट केला. हि पीडित मुलगी अल्पवयीन होती. यातच तिचा फोटो शेअर केल्याने तिची ओळख पटत असल्याने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्याविरोधात पोस्को २३, जुवेनाईल जस्टीस ७४, आयपीएस २२८ अ या कलमांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट मध्ये नेमक काय म्हटलं ?
देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे..
मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.