गुढी पाडव्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर : आज गुढी पाडवा अर्थात हिंदू नववर्ष. महाराष्ट्रात घरोघरी आज गुढी उभारली जात आहे. आज उगवत्या सूर्याच्या साक्षीने घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत केलं गेलं.  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कोल्हापूरातील घरी गुढीपाडव्याचा पवित्र सण साजरा करून हिंदू नववर्षाचे स्वागत केले.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ननवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे नूतन वर्ष सर्वांसाठी आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्यातील जनतेला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

गेल्या दोन वर्षांपासून इतर सणांप्रमाणे गुढी पाडव्यावर आणि मुंबई- उपनगरात निघणाऱ्या शोभायात्रांवर कोरोनाचे सावट होतं. त्यामुळे सण निर्बंध काढून टाकण्यात आले. या पार्श्वभूमीवर यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जात आहे. आज अनेक  ठिकाणी  शोभायात्रा निघाल्या आहेत. हिंदू नववर्षाची सुरुवात दणक्यात झाली आहे.