नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार, चंद्रकांत पाटील
मुंबई : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता देण्यात आली होती आज त्याबाबत शासन आदेश जरी करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोउद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली असुन याकरिता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार देखील मानले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये पाटील म्हणतात ” राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी तसेच कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता देण्यात आली. नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार आहे. आज त्याचा शासन आदेश जारी करण्यात आला.
या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित केल्यास वस्त्रोद्योग क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होणार असून याक्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.