Modi@9 कार्यक्रमाअंतर्गत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वडोदरा आणि छोटा उदयपूर लोकसभा संगठनात्मक गुजरात दौऱ्यावर

गुजरात: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक बांधणी करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रीय पातळीवरून सर्व नेत्यांना विविध राज्यात प्रवास करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. ,महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या Modi@9 कार्यक्रमाअंतर्गत गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यादरम्यान पाटील यांनी वडोदरा, छोटा उदयपूर या लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या यांच्या ९वर्षाच्या कार्याचा लेखा जोखा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज चंद्रकांत पाटील हे लोकसभा प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी गोध्रा लोकसभा मतदार संघातील भाजप कार्यालय ‘कमलम्’ येथे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष श्रीअश्विन भाई पटेल यांनी पाटील यांचे स्वागत केले. आज गोध्रा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पाटील भेटणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!