उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लालाजी शर्मा यांच्य्या अकोला येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस केली श्रद्धांजली अर्पण

23
अकोला : भारतीय जनता पक्षाचे कर्मठ कार्यकर्ते तथा अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धनजी उर्फ लालाजी शर्मा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी  लालाजींच्या अकोला येथील घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेेस श्रद्धांजली अर्पण केली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, लालाजी हे रा. स्व. संघाच्या मुशीत तयार झालेले आणि पक्ष संघटनेसाठी समर्पित कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी लालाजींच्या अकोला येथील घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेेस श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, शर्मा कुटुंबियांचे सांत्वन केले. लालाजींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे. शर्मा कुटुंबियांवर आलेल्या या दुःखकाळात भारतीय जनता पक्ष सोबत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
लालाजी हे सलग सहा वेळा अकोल्यातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. अकोला जिल्ह्यात आणि भाजपच्या वर्तुळात लालाजी नावाने ते लोकप्रिय होते. त्यांचं राहणीमान देखील अतिशय साधं होत. लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.