मुंबई : उत्तरकाशीच्या सिल्कारा येथील बोगद्यात मागील सतरा दिवसांपासून अडकलेल्या मजुरांची एन डी आर एफ, एस डी आर एफ पथकातील जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अखेर सुखरूप सुटका केली. त्यांच्या या जिद्दीला सलाम असे उदगार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मार्गदर्शनामुळे हे बचाकार्य सिद्धीस नेण्यात यश आले आहे, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी या यशस्वी कामगिरीचे कौतुक केले . ते म्हणाले कि, या बांधवांच्या सुटकेमुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद हा अत्यंत भावस्पर्शी क्षण आहे. मागील सतरा दिवस मजूर बांधवांनी दाखवलेल्या प्रबळ इच्छाशक्तीला, आशावादाला सलाम!
उत्तरकाशीतील सिल्कारा येथे बांधल्या जात असलेल्या बोगद्यात मोठा ढिगारा कोसळल्याने ४१ मजूर आत अडकून पडले होते. त्यांना काढण्यासाठी मागील १७ दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न्न सुरु होते. यासाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आला. अखेर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी या मजुरांना अडीच फूट रुंदीच्या पाईपच्या मदतीने बाहेर काढले.
Get real time updates directly on you device, subscribe now.