पुणे : कोथरुडमधील नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी येणाऱ्या कायदेविषयक समस्या तातडीने सोडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत सल्ला उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. याचा लाभ अनेकांना होत असून, नुकतेच कोथरुडमधील निर्मल रेसिडेन्सी येथील नागरिकांना माझ्या उपक्रमाचा लाभ झाला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, निर्मल रेसिडेन्सी या सोसायटीमधील रहिवाश्यांना जलदगतीने प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून मदतीचा हात पुढे करण्यात आला. येथील रहिवाशांचा हा प्रश्न सोडवल्याबद्दल आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले. भविष्यातही कोथरुडकरांच्या सेवेसाठी असाच सदैव तत्पर राहण्याचा संकल्प राहणार असल्याचे पाटील म्हणाले.