दिल्ली: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि जगातली सर्वात मोठी संघटना म्हणून उदयास येत आहे. या परिषदेच्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा उदघाटन सोहळा नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते पार पडला. विद्यार्थी परिषदेच्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन तरुण मित्रांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, यावेळी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे ऊर्जास्रोत स्वर्गीय मदनदास देवीजींना अभिवादन केले. पाटील पुढे म्हणाले कि, वास्तविक, विद्यार्थी परिषद ही माझी मातृसंस्था; याच संघटनेमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे या अधिवेशनात सहभागी होत असताना, अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जुन्या सहकारी मित्रांची भेट देखील घेतली. विशेष म्हणजे, या अधिवेशनात ईशान्य भारतातील काही तरुण मित्रांशी संवाद साधताना, त्यांचे अनुभव जाणून घेतले. विद्यार्थी परिषदेचे काम दिवसागणिक चहुबाजूंनी विस्तारत असल्याचे पाहून आनंद झाला, असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Get real time updates directly on you device, subscribe now.