दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान समारोह; ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचे विमोचन

5
नागपूर : नागपूरमधील राजभवन येथे स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान समारोह व कौशल्य विकास विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महापुरूषांचे कौशल्य विचार’ पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्ताजी डिडोळकर यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, कौशल्य विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव डॉ.मुरलीधर चांदोरकर, आ.रामदास आंबटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.सुभाष चौधरी, व्यवसाय शिक्षण संचालक दिगंबर दळवी यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.