न्या. संदीप शिंदे समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर

33

नागपूर : राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे (निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज न्या. शिंदे यांनी विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहवाल सुपुर्द केला असता त्यांनी मा. न्यायमूर्ती संदिप शिंदें (निवृत्त ) समितीचे राज्य शासनाच्या वतीने आभार मानले. यापूर्वी न्या शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला होता.
राज्यातील कुणबी- मराठा व मराठा- कुणबी जातीचा शोध घेऊन प्रमाणपत्र देण्याची पद्धत निश्चित करण्यासाठी नियुक्त न्या. शिंदे समितीने अभिप्रेत असे कामकाज केले असल्याचे  मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव डॉ. भांगे यांनी समितीने आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.
याप्रसंगी  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजनसार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलआमदार भरत गोगावलेमुख्य सचिव मनोज सौनिकसामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे आदी उपस्थित होते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.