कामगार बांधवांना संघटित करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

7
अमरावती : अमरावती मध्ये भाजपा कामगार आघाडीच्या वतीने आयोजित लाभार्थी मेळावा आज संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील यांनी गरजू बांधवांना संसारोपयोगी उपयोगी साहित्य वाटप केले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. माता भगिनींच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी हर घर शौचालय, प्रत्येक देशवासीयांना उत्तम आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील प्रत्येक मुलगी डाॅक्टर, इंजिनिअर व्हावी; यासाठी आठ लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या प्रत्येक मुलीचे शिक्षण हे मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार बांधवांना संघटित करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, भविष्यातही कामगार मोर्चा जेजे लाभार्थी मेळावे किंवा कामगारांच्या हिताच्या योजना करतील त्याप्रसंगी संपूर्ण सहकार्य भाजपच्या वतीने करण्याचे त्यांनी आश्वास्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, खासदार अनिल बोंडे, तुषार भारतीय, कार्यक्रमाच्या संयोजिका भाग्यश्री देशमुख यांसह कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.