‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांची घोषणा… चंद्रकांत पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

32

नागपूर : साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, कोल्हापूरमधील मराठी कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या विस्थापितांचे चित्रण करणाऱ्या ‘रिंगाण’ या कादंबरीला, तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला यंदाचा ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, यंदा हिंदीतील ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ संजीव यांना त्यांच्या ‘मुझे पहचानो’ या कादंबरीसाठी तर इंग्रजीसाठी नीलम शरण गौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.