महायुती सरकारच्या कार्यकाळात सर्वांगीण विकासाला लाभतोय आकार, प्रगतिशील सोलापूरमध्ये “मराठा भवन” लवकरच होणार साकार !- चंद्रकांत पाटील

45

सोलापूर : चंद्रभागेच्या काठावर वसलेले पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव! मागील वर्षीच्या कार्तिक वारीला पंढरपूरात भव्य असे “मराठा भवन” निर्माण करणार असल्याचे वचन मराठा समाजाला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. या अनुषंगाने या वास्तूसाठी आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने शहरातील सर्वे नंबर १४२ अंतर्गत संत गजानन महाराज पिछाडी रस्ता स्टेशन रोड पंढरपूर येथील जागा मराठा सांस्कृतिक भवनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने नियोजन समितीच्या माध्यमातून या भव्य वास्तूसाठी निधी उपलब्ध करून देताना मला विशेष आनंद वाटत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

मराठा समाजाच्या सांस्कृतिक उत्कर्षासाठी पंढरपूर येथे प्रशस्त “मराठा भवन” बांधण्याच्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पंढरपूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दिलेल्या 5 कोटी 5 लाख 21 हजार 704 रुपयांच्या निधीतून पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कामाची निविदाही प्रसिद्ध केलेली आहे. परंतु पंढरपूर शहरात मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जी जागा उपलब्ध झालेली आहे त्या जागेवर पार्किंगचे आरक्षण असल्याने ते आरक्षण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नगर विकास विभागाला कळविलेले आहे. तसेच हे आरक्षण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा सुरू असून पुढील आठ ते दहा दिवसात हे आरक्षण काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.