विकसित भारताची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प ! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7
मुंबई : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. हा अंतरीम अर्थसंकल्प देशातील जनतेला ‘विश्वास’ देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील यांनी म्हटले कि, हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, गरीब आणि तरुणांच्या भवितव्याचा विचार करणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प असून यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहचेल, असा ठाम विश्वास वाटतो, असे पाटील यांनी म्हटले. या मानव केंद्रीत अर्थसंकल्पासाठी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :
देशात सर्वांगीण विकासाचा परिणाम सर्वच क्षेत्रांत दिसून येत आहे. या अंर्तगत गुंतवणूक मजबूत असून आपली अर्थव्यवस्थाही सशक्त आहे. लोकांचे आयुष्यमान सुधारले असून त्यांच्या मिळकतीतही वाढ झाली आहे. महागाई माफक होऊन लोकांच्या सरासरी वास्तविक उत्पन्नात 50% वाढ झाली आहे. 11.8 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. पीक विमा योजनेचा ४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी खूप काम केले आहे. पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 70% पेक्षा जास्त घरे महिलांच्या मालकीची आहेत. मुद्रा योजनेंतर्गत महिलांना 30 कोटी रुपयांहून अधिक कर्ज देण्यात आले आहे. आपल्या तंत्र स्नेही (टेक-सॅव्ही) तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल. 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल. कॉर्पस कमी किंवा शून्य व्याज दरांसह दीर्घ कालावधीसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा किंवा पुनर्वित्त प्रदान करेल. सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचाही आयुष्मान भारत योजनेत समावेश केला जाईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.