चंद्रकांत पाटील यांनी घेतली माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट; ‘लोकभवन’मध्ये जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबईतील ‘लोकभवन’ येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर स्नेहपूर्ण संवाद झाला.
या भेटीबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोश्यारीजींचे मार्गदर्शन आणि अनुभव नेहमीच ऊर्जा देणारे असतात. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळालाच, पण त्याचसोबत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही कोश्यारी यांचे राज्यातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोकभवन येथील या भेटीत दोन्ही नेत्यांनी चालू घडामोडींवरही चर्चा केल्याचे समजते. अनुभवी नेत्यांच्या भेटीगाठीतून नवीन ऊर्जा मिळते, अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.