४ मार्चला डिजिटल मिडियाची बारामतीत राज्यस्तरीय कार्यशाळा… सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या होणाऱ्या पहिल्याच प्रकट मुलाखतीकडे सर्वांचे विशेष लक्ष

29

पुणे : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिध्दगिरी कणेरी मठ येथे झालेल्या ठरावानुसार राज्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या ४ मार्च रोजी बारामती येथे पहिल्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यशाळेच्या निमित्ताने प्रथमच सौ.सुनेत्रा अजित पवार यांची प्रकट मुलाखत विशेष औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.सौ.सुनेत्रा पवार यांची  होत असलेली ही प्रकट मुलाखत नटरंग फेम ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घेणार आहेत. या प्रथमच होणाऱ्या मुलाखतीकडे सर्वांचेच विशेष लक्ष असणार आहे.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष, राजा माने यांनी माहिती दिली कि,  या कार्यशाळेत दरम्यान महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने संघटनेच्यावतीने राज्यातील दहा कर्तबगार महिला पत्रकारांचा महागौरव राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करुन सन्मान केला जाणार आहे. ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
यासोबतच या कार्यशाळेत पत्रकारांची निवडणूक काळातील आचार संहिता, डिजिटल माध्यमाचे अर्थकारण व नवे प्रवाह, गुन्हेगारीच्या बातम्या आणि कायदा आदी विषयांवर तज्ज्ञ मान्यवर विचार मंथन करणार आहेत. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच संघटनेची राज्य कार्यकारिणी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.