चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत घेतली सुनेत्रा पवारांची भेट..  विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केल्याची पाटील यांची माहिती

4

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची त्यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत तब्बल पाऊण तास चर्चा केली. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांचे बारामतीत आगमन झाल्यानंतर ते थेट सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबत मनसोक्त गप्पा, विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली, असल्याचे पाटील यांनी म्हटले.
या  भेटीत चंद्रकांत पाटील यांच्या समवेत आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जय पवार, संभाजी होळकर, जय पाटील, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.