पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरूड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. औंध, बाणेर, बावधन या भागातील नालेसफाईची आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा काही सूचना पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी आज बाणेर- औंध क्षेत्रीय कार्यालय तसेच कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले कि, नाले सफाई संदर्भात अपूर्ण कामे करून घ्यावीत. नाल्यांचे खोलीकरण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पाणी ज्या ठिकाणी साचते त्याची पाहणी करून त्याबाबत योग्य उपाययोजना करावीत अशा काही सूचना पाटील यांनी दिल्या.
पाटील पुढे म्हणाले कि, नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या खड्डयांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हि रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत असेही पाटील यांनी सांगितले.
रस्ते दुरुतीसोबतच पथ दिव्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत असे आदेश पाटील यांनी यावेळी दिले. तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांची वेळीच छाटणी करावी. यासोबतच अतिक्रमण मुक्त पदपथ करावेत अशा महत्वाच्या सूचना या बैठकीत पाटील यांनी दिल्या.
या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, घनकचरा विभागाचे उपयुक्त संदीप कदम, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनिःसारण विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजरे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, उपयुक्त परिमंडळ क्रमांक २ चे उपयुक्त गणेश सोनुने , बाणेर- औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर, कोथरूड -बावधनचे सहाय्यक आयुक्त केदार वझे, भाजप शहर सरचिटणिस पुनीत जोशी, कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक अमोल बालवाडकर,किरण दगडे पाटील यांनसह पालिकेच्या विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.