पुण्यातील प्रभाग १५ मधील नगरसेविका नंदाताई आबनावे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात संपन्न
पुणे : पुण्यातील प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या केशवनगर, मांजरी, साडेसतरानळी आणि शेवाळेवाडी परिसराच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका नंदाताई आबनावे यांच्या भव्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी नंदाताई आबनावे आणि आबनावे परिवाराला या नवीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हे नवीन जनसंपर्क कार्यालय परिसरातील नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणारे, जनतेशी सातत्याने जिवंत संवाद साधणारे आणि लोकसेवेचे एक अत्यंत प्रभावी केंद्र ठरेल, यात शंका नाही. स्थानिक नागरिकांना आपल्या हक्काच्या कामांसाठी या कार्यालयामुळे मोठी सोय उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा प्रदेश ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, अनिल आबनावे, अविनाश आबनावे, प्रभाग समिती अध्यक्ष प्रशांत तुपे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.