कोथरूड येथे प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका मनिषा बुटाला यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पुणे : कोथरूड येथे प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका मनिषा बुटाला यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पाटील यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यातील थेट संवाद हा विश्वासाचा पाया असतो. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने उपाययोजना करण्यासाठी अशा कार्यालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे कार्यालय जनतेसाठी नेहमी खुले राहील आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. कोथरूडमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाहीही यावेळी पाटील यांनी दिली.
या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा नेते डॉ. संदीप बुटाला, प्रभाग अध्यक्षा ॲड. वासंती जाधव, मंजुषा खर्डेकर, नगरसेवक पुनीत जोशी, सुनील पांडे, नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, ज्योत्स्ना कुलकर्णी, स्विकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर, प्रभाग क्रमांक ११ चे अध्यक्ष अतुल शिंदे, श्रीधर मोहोळ यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.