अमरावती जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चिखलदरा पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

17

अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे लोकार्पण केले. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चिखलदरा पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे पाटील यांनी आश्वस्त केले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे देखील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. येथील कॅम्पची पाहणी केली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद देखील साधला. अमरावती जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चिखलदरा पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे पाटील यांनी आश्वस्त केले.

मेळघाट हे राज्याचे मुख्य जैव विविधतेचे भांडार आहे. मेळघाटाचा उतार हा पूर्णा नदीचा पाणलोट भाग तयार करतो. मेळघाट प्रदेश मधुन तीन प्रमुख उपनद्या चंद्रभागा, अदनानी आणि वान हया पूर्णा नदितून वाहतात.मेळघाट परिसर हा १९७४ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.