पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट… साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश

37

अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील  मागील दोन दिवसांपासून अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. याप्रसंगी वैद्यकीय सोयी-सुविधांचा व रुग्णांच्या प्रकृतीच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा घेऊन साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, चिखलदरा तालुक्यातील हतरु व चुरणी या गावात साथरोगामुळे अचानक 24 जणांना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. रुग्णांवर तातडीने औषधोपचार करण्यासाठी जिल्हास्तरावरील वैद्यकीय पथकही त्याठिकाणी पाठविण्यात आले होते. पथक व स्थानिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित रुग्णांवर उपचार केले. चिखलदरा दौऱ्यादरम्यान या घटनेची दखल घेऊन पाटील यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. याप्रसंगी वैद्यकीय सोयी-सुविधांचा व रुग्णांच्या प्रकृतीच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा घेऊन साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देखील दिले.

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसीलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसिलदार सुधीर धावडे तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.