उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली रायगडाची पाहणी… छत्रपती शिवरायांच्या समाधीचे घेतले दर्शन
 
				रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड येथील समाधी स्मारकाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ रायगडावर जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर तयारीचा आढावा घेण्यासाठी रायगडाची पाहणी केली. यावेळी शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झाले.

यावेळी मंत्री ॲड आशिषजी शेलार, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी नियोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी प्रथम पाचाड येथे जिजाऊ साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि गडावर राज दरबार, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर ,छत्रपती शिवरायांची समाधी इत्यादी ठिकाणी पायी चालत जाऊन छत्रपती शिवरायांना वंदन केले.

 
			