पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच नरेंद्र मोदींनी घेतला महत्वपूर्ण निर्णय… शेतकरी सन्मान निधीचा हफ्ता केला जारी

111

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल शपथविधी मोठ्या थाटात पार पडला. आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार देखील स्वीकारला. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच मोदी यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी प्रथम देशातील शेतकऱ्यांचा विचार केला आहे. शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी मदत म्हणून मोदींनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे काही दिवसातच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.
शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्याकरिता नरेंद्र मोदी सरकारने पीएम शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली होती. शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची मदत दिली जाते. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने हि योजना सुरु केली आहे. राज्य सरकारकडूनही  सहा हजार रुपये दिले जातात. एकूण शेतकऱ्यांच्या खात्यात १२००० रुपये जमा केले जातात.  देशभरातील ९. ३ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.