पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी संकल्पबद्ध; मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्षांची कार्यशाळा आज पक्षाचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाशजी व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी संकल्पबद्ध होत आम्ही या बैठकीतून नवचैतन्य घेऊन पुढे जात आहोत.ही कार्यशाळा म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचे व उत्साहाचे संचार करणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस व आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे, ॲड. माधवीताई नाईक, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.