नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पॉलिटेक्निक महाविद्यालये आणि उद्योग यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

18

पुणे : IIM जम्मूच्या वतीने आयोजित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याचर्चासत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व आहे. अभाविपच्या काळात आम्ही व्यवसायाभिमुख शिक्षणाचा नेहमीच आग्रह धरत होतो. नवीन शैक्षणिक धोरणात याचा अंतर्भाव असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले कि, २०२२ ला महायुतीचे सरकार आल्यानंतर माझ्याकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जबाबदारी आल्यानंतर सर्वात प्रथम नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्र आज संपूर्ण देशात प्रथम आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पॉलिटेक्निक महाविद्यालये आणि उद्योग यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळेल, आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असा माझा आग्रह आहे. त्यामुळे आगामी काळात उद्योगांच्या आवश्यकतेनुसार पॉलिटेक्निकच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. मिलिंद कांबळे, विनय सहस्रबुद्धे, आयआयएम जम्मूचे डॉ. डी. एस. सहाय, इंद्रनिल चितळे, श्रीकांत बडवे, राजेश पांडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.