पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा महामेळावा संपन्न

30
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा महामेळावा रविवारी संपन्न झाला. हा मेळावा म्हणजे मुरली आण्णांच्या विजयाची नांदीच होती. महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या महामेळाव्यास उपस्थित होते‌. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, येत्या २५ एप्रिल रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मोहोळ आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जमून आपली ताकद दाखवावी, असे पाटील यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देखील पुणेकरांना संबोधित करणार आहेत. या सभेनंतर पुणे, बारामती, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. त्यामुळे या सभेला ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले. यावेळी महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी महायुतीच्या विजयाचा संकल्प केला.
यावेळी मा. मंत्री दिलीप कांबळे, दीपक मानकर, धीरज घाटे, प्रमोदनाना भानगिरे, अजयबापू भोसले, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, मनसेचे नेते बाबू वागसकर, जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, परशूराम वाडेकर, साईनाथ बाबर, संजय आल्हाट, संग्राम शेवाळे, मयुर गुजर, भरत लगड, प्रकाश भालेराव, रामभाऊ कांबळे यांच्यासह महायुतीतील घटकपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.