मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे आयोजित रक्तदान महासंकल्प शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महा संकल्प शिबिराला युवकांचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील 175 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर तसेच भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, मोहन नगर येथे या शिबिराचे आयोजन केले होते.
आमदार उमा खापरे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र छाबडा , सतीश भोसले, राजनीर इन्व्हायटेकचे विनीत मोरे आणि सहकारी उपस्थित होते.
या उपक्रमास शासनाच्या वाय सी एम ब्लड सेंटरचे डॉ.गणेश लांडे, किशन गायकवाड यांचे सहकारी व त्रिमूर्ती मित्र मंडळ चिंचवड पोलीस लाईन व आरंभ सोशल फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.