राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याशी ममता बॅनर्जी यांच्या राज्य सरकारचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि लज्जास्पद – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

9

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नाही. ज्यामुळे प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. हि वागणूक खटकणारी आणि देशाच्या राष्ट्रपतींच अवमान असल्याची भावना सर्वस्थरातून व्यक्त केली जात आहे. याबाबत स्वत: द्रौपदी मुर्मू यांनी खंत व्यक्त केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पश्चिम बंगाल सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्याशी ममता बॅनर्जी यांच्या राज्य सरकारचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि लज्जास्पद आहे. हा केवळ माननीय राष्ट्रपतींचा अपमान नाही तर भारताच्या संवैधानिक मूल्यांचा आणि आदिवासी समाजाचाही अपमान आहे. राष्ट्रपती हे भारत देशातील सर्वोच्च घटनात्मक पद आहेत आणि ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जो अपमान केला आहे तो त्यांनी जोपासलेल्या अहंकाराचे आणि धोकादायक राजकीय संस्कृतीचे प्रतिक आहे. राष्ट्रपतींचा अपमान हा भारतीय संविधानाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. पश्चिम बंगाल सरकारचे हे अत्यंत लाजीरवाणे कृत्य असल्याने पश्चिम बंगाल सरकारचा पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

देशाच्या राष्ट्रपती या त्यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय संथाल सम्मेलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले. मूलतः हे सम्मेलन गोसाईनपूर येथे आयोजित करण्यात आले होते, पण राज्य सरकारने ते बिधाननगर येथे हलवले. राष्ट्रपतींना अतिरिक्त 30 किलोमीटर प्रवास करावा लागला, अव्यवस्था झाली. एकूणच याचा परिणाम कार्यक्रमावर झाला. राष्ट्रपतींनी याबाबत दुःख व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान आणि प्रोटोकॉल दिला गेला नाही. याबाबत राष्ट्रपतींनी स्वतः भाषणात उल्लेख केला आणि राज्य सरकारच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.