राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्राला निश्चितच नवी दिशा व बळ मिळेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7

रायगड, लोणेरे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे, जि. रायगड येथील अठ्ठाविसाव्या दीक्षांत समारंभास महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांचे आज रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक स्वागत केले.

विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीसह तंत्रशिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांसाठीच्या विविध उपक्रमांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, रोजगाराभिमुख आणि भविष्यवेधी करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्राला निश्चितच नवी दिशा व बळ मिळेल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.