पुणे येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

3

पुणे, १० ऑक्टोबर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पदवीधर व शिक्षक बांधवांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर जुनी पेन्शन समन्वय संघाने भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देत, या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी शिक्षक मतदारसंघाचे संयोजक डॉ. प्रशम कोल्हे, महायुतीच्या पदवीधरच्या उमेदवार डॅा. स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे, माजी आमदार संजय जगताप यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.