पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजप सज्ज… उमेदवारांच्या विजयासाठी पदाधिकारी एकवटले

4

पुणे, ९ ऑक्टोबर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, नियोजन आणि पुढील कार्यवाही याबाबत प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला. या बैठकीत सहभागी होत दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक तयारी, संघटनात्मक बांधणी, मतदारांशी संपर्क, प्रचाराचे नियोजन आणि आगामी काळातील कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा केली. पदवीधर आणि शिक्षकांच्या अपेक्षा, प्रश्न व हिताला प्राधान्य देत पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक ताकदीच्या आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार स्मिताताई जाधव, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, मंत्री माधुरीताई मिसाळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस निरंजनजी डावखरे, महापौर सौ. मंजूषाताई नागपुरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.