पदवीधर आणि शिक्षकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा… मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन

8

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच निवडणूक सहप्रभारी व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही मतदारसंघांत विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपा-महायुतीच्या प्रचार मोहिमेला सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात आयोजित मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रथमच महिला नेतृत्वाला संधी मिळत असून, डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयातून नवा इतिहास घडवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराच्या पुढील टप्प्यांसाठी संघटनात्मक तयारी, प्रभावी जनसंपर्क आणि समन्वयपूर्ण प्रचार यावर यावेळी भर देण्यात आला.

या प्रचारास  मंत्री माधुरीताई मिसाळ, सहनिवडणूक प्रमुख शरद लाड, डॉ. प्रशम कोल्हे, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापौर मंजुषा नागपुरे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापभय्या माने, भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, आमदार निरंजन डावखरे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, हेमंत रासने, राहुल कुल, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महापालिकेचे स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विक्रम पावसकर, निवेदिता एकबोटे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.