कॉंग्रेस भवन, पुणे येथे शहराध्यक्ष श्री. रमेश बागवे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

1

महाराष्ट्र दिनानिमित्त कॉंग्रेस भवन , पुणे येथे शहराध्यक्ष श्री. रमेश बागवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री. बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच राज्याचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण व स्वातंत्र्यसैनिक शहिद नारायणराव दाभाडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार श्री. मोहन जोशी, माजी मंत्री श्री. बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार श्री. उल्हासदादा पवार, प्रदेश सरचिटणीस श्री. अभय छाजेड, अभा महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस सौ. कमल व्यवहारे तसेच इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.