बापट यांच्याकडून पुणेकरांची फसवणूक – मोहन जोशी

धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पुण्यावर पाणी कपातीचे संकट

13
पुणे : पालकमंत्री गिरीश बापट हेच पुण्यातील पाणीटंचाईला कारणीभूत असून, निवडणूकाळामध्ये भाजपाला मतदान व्हावे या कारणासाठी बारामती मतदार संघाला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले असल्याची टीका काँग्रेस पुणे लोकसभा उमेदवार मोहन जोशी यांनी केला.
धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पुण्यावरील पाणी कपातीचे संकट वाढण्याची शक्यता असून संबंधित विभागाकडून ३० जुलै पर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरु झाले आहे. गेल्यावर्षी पाऊस होऊन सुद्धा पाणीकपातीची वेळ येते याला बापट यांचे नियोजन शून्य व्यवस्थापन कारणीभूत असून दिवसाआड पाणीपुरवठा झाल्याने पुणेकरांचे जे हाल होणार आहेत या महापापासाठी बापटाचं जवाबदार असल्याचे जोशी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.