पुणे : फर्ग्युसन रोड येथे गॅस पाइपलाइन फुटली, परिस्थिती नियंत्रणात

1

पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी फुटपाथ रुंदीकरणाचे काम सुरु आहे. आज दुपारी १२. ३० च्या दरम्यान फर्ग्युसन रोड येथे काम चालू असताना भूमिगत गॅस पाइपलाइन फुटल्याने वायू गळती सुरु झाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत अग्निशामक दलाशी संपर्क साधला, अग्निशामक दल, पोलीस  व महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी योग्य उपाययोजना करून सदर वायू गळती थांबविली. एफ . सी . रोडवर बर्गर किंग समोर हा प्रकार घडला. या घटनेमुळे काहीकाळ नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.