पाणीप्रश्न कसा सोडवायचा? अजित पवारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

आज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली आणि दुष्काळानं ग्रासलेल्या अनेक गावांचा पाणीप्रश्न कसा सोडवायचा? यावर प्रामुख्यानं चर्चा केली. या चर्चेत पिण्याचं पाणी, टँकर, चारा छावण्या, वीज पुरवठा यांसारख्या मुद्द्यांना अधिक प्राधान्य दिलं. तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातला दुष्काळ आणि त्यावरच्या आवश्यक उपाययोजना यासंदर्भातील निवेदनपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी आ. अशोक पवार, दिलीप मोहिते, रमेश थोरात यांसोबतच पुणे जिल्ह्यातले सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.