साडी सेंटरला आग, पाच कामगारांचा मृत्यू

1

पुणे जिल्ह्यातील देवाची उरळी भागातील एका साडी सेंटरला आज ( ९ मे  ) पहाटे ४.३० च्या सुमारास अचानक आग लागली. प्राथमिक माहिती नुसार आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, लाखो रुपयांचा माल आणि साहित्य जाळून खाक झाले आहे.  आगीची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटना स्थळी पोहोचल्या आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर  आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस यंत्रणा सदर घटनेची चौकशी करत आहे.