पुणे : “अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” चा सामाजिक वारसा कायम

1 944

“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” च्या वतीने “मातोश्री वृध्दाश्रम” या संस्थेस इन्व्हर्टर तसेच गरीब तथा निवडक गरजू घरांतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रम पुण्यातील सह धर्मादाय आयुक्त “मा. दिलीपजी देशमुख (साहेब)”, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष “अॅड. मा. मिलिंदजी पवार (साहेब)”, तसेच भिंताडे उद्योग समुहाच्या संचालिका “मा. श्रीमती शालन (आक्का) उत्तमराव भिंताडे” यांच्या शुभहस्ते पार पडला.

या प्रसंगी हिंदूस्थानातील पहिल्या “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट” च्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या “मा. राजेंद्रजी गुप्ता” यांस ट्रस्टच्या वतीने विशेष सन्मानीत करण्यात आले.

या  कार्यक्रमास भितांडे उद्योग समूहाचे संचालक मा. गणेशजी भिंताडे, अ‍ॅड. प्रतापदादा परदेशी, मा. शिरीषजी मोहिते, मा. मोहनजी ढमढेरे, मा. संदीपजी कोंडे, मा. महेशजी जगताप, मा. दिपकजी तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. जतिनजी पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

ट्रस्टच्या कार्याचा गौरव करीत अशा समाजोपयोगी कार्यात सामान्यांचा सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी केले.

अ‍ॅड. मिलींद पवार म्हणाले, पुणे शहरात अशा अनेक संस्था आहेत की ज्या समाजातील गरज ओळखून त्यानुसार मदत करतात ही कौतुकाची बाब आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.