पुण्याचा आणखी जोमाने विकास करण्याची जवाबदारी माझ्यावर – बापट

2

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट यांचा तब्बल 3 लाख 24 हजार 628 या ऐतिहासिक मताधिक्यानी विजय झाला. गिरीश बापट यांनी आज विजयानंतर भाजप ,शिवसेना , आर.पी.आय ,रा. स. प. आणि शिवसंग्राम आदी. घटक पक्षांच्या नेत्यांना घेऊन पत्रकार परिषद घेतली.  

बापट म्हणाले  ”मला निवडून दिलेत याबद्दल मी पुणेकर जनतेचे आभार मानतो. या निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी जीवाचे रान केलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, लोकजनशक्ती पार्टी, याशिवाय मला पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, संघाच्या स्वयंसेवकांचे व परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. निवडणुकीत प्राप्त झालेलं यश हे माझे एकट्याचे नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचे आहे. यापुढेही आपले प्रेम असेच माझ्यावर कायम राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. या विजयामुळे पुण्याचा आणखी जोमाने विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. ही जबाबदारी अत्यंत नम्रपणे पार पडण्याचे वचन मी देतो.” यावेळी पुणे भाजप अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसळ, आमदार विजय काळे, आमदार भीमराव तापकीर,आमदार लक्ष्मणराव  जगताप, आमदार जगदीश मुळीक,  शिवसंग्रामचे पुणे शहराध्यक्ष व पुणे म्हाडा संचालक भरत लगड, कृष्णा खोरे महामंडळ संचालक शेखर पवार, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ संचालक किरण ओहोळ ,  शिवसंग्राम जिल्हा संपर्क प्रमुख तुषार काकडे,  आर.पी. आय. चे अशोक कांबळे, रासपचे सनी रायकर आदी मान्यवारांसोबत पुण्यातील भाजप शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!