कोण होणार पुण्याचा पालक मंत्री ?

14

पुणे व मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये गिरीश बापट व  श्रीरंग बारणे यांचा विक्रमी मतांनी  विजय झाला. शिरूर आणि बारामती  मध्ये मात्र  डॉ अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे सरस ठरले.  बापट यांचा राजकारणातील अनुभव, पक्ष संघटना व प्रशासनावरील पकड मजबूत होती म्हणूनच पुण्यात लोकसभेत भाजपला निर्विवाद विजय मिळाला.


आता बापट दिल्ली मध्ये गेल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी कोणत्या मंत्र्याला भाजप देणार याच्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे, कारण पुणे शहर जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप आहे, पण अंतर्गत गट बाजी ला  विधानसभेला लगाम लावण्यासाठी  पक्षाचं नुकसान होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठी खास माणसाचीच निवड करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.