बाणेर-बालेवाडी येथील मुळा नदीलगत असलेल्या पुरग्रस्थांना मदत

बाणेर-बालेवाडी येथील मुळा नदीलगत असलेल्या पुरग्रस्थांना मदत म्हणुन नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने खासदार श्री.गिरीषजी बापट साहेब यांच्या हस्ते सुमारे १५० पुरग्रस्त कुटुंबांना एक महिण्याचे रेशन वाटप करण्यात आले,यावेळी पुर परिस्थितीमध्ये स्थलांतरीत कुटुंबियांना जेवणाची, ब्लॅन्केट्स, चादर, दैनंदिन उपयोगी वस्तु पुरवुन व वैद्यकिय सेवा देणार्या विविध संस्था त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बाणेर-बालेवाडी मेडीको असोसिएशन, बाणेर-बालेवाडी रेसिडेन्स असोसिएशन, वसुंधरा अभियान, बालेवाडी वुमन्स क्लब, आर्ट आॅफ लिविंग, लायन्स क्लब, राॅबिन हुड आर्मी, बाणेर-पाषाण लिंक रोड विकास समिती, बाणेर बालेवाडी व्यापारी संघटणा या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे परिसरातील पुर परिस्थितीप्रमाणेच कोल्हापुर, सातारा, सांगली येथे अडकलेल्या महापुरातील नागरीकांना देखिल पिण्याच्या पाण्याच्या बाॅटल्स व मदत पोहचवण्याचे आवाहन सर्व संस्थांना व नागरीकांना खासदार गिरीषजी बापट साहेब यांनी केले.

यावेळी उद्योजक सुनिलजी माने, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, शिवम सुतार, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, दिलिप मुरकुटे, आबा सुतार, भास्कर कोकाटे, औंध-बाणेर महा.पालिका सहा.आयुक्त, प्रकाश तापकीर, अनिल बालवडकर, बालेवाडी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा रुपाली बालवडकर, डाॅ.राजेश देशपांडे, मित विज, प्रशांत पाटील, सागर बालवडकर, पोलिस पाटील अनंता कांबळे, किरण धेंडे, विकास बालवडकर व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते.