पुण्यात महिन्याचा पहिला शनिवार आता ‘प्रवासी दिन’
सार्वजनिक वाहतुकीची दुरावस्था नेहमीच चर्चा विषय राहिलेल्या पुण्यात आता प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पी.एम.पी. प्रशासनाने ‘प्रवासी दिन’ हा नवीन उपक्रम सुरु करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवाशांना पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील १३आगारांत लेखी आणि तोंडी स्वरूपाची तक्रार करता येणार आहे. यावेळी आगार प्रमुख, अभियंते देखील उपस्थित असणार आहेत.
पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक वाघमारे यांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्याच ठिकाणी उपाययोजना करायची कार्यवाही करायची आहे तसे शक्य नसल्यास नंतर प्रवाशांना झालेली कार्यवाही कळवायची आहे. धोरणात्मक निर्णयाबाबतच्या तक्रारींचे संकलन करण्यात येणार असून, त्यानुसार उपाययोजना कारण्यात येणार आहेत.