पराक्रमी सरदार झुंजारराव मरळ यांच्या वंशजांकडून, मुख्यमंत्री सहायता निधीस रु. १५ हजारांची मदत
संपूर्ण राज्य संकटात असताना स्वराज्याचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार मागे कसे राहतील, अशाच एका पराक्रमी सरदारांच्या वंशाज्यानी या कोरोनाच्या लढ्यात राज्य सरकारला मदत करत या लढ्याला बळ देण्याचे काम केले आहे.
छत्रपती शिवरायांनी ज्या तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले त्या किल्ल्याचे पराक्रमी सरदार झुंजारराव मरळ यांच्या वंशजांनी मुख्यमंत्री सहायता निधीस रु. १५ हजार एवढी मदत केली, या कठिण काळात त्यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपासून छत्रपती शिवरायांच्या विचारांची जपणूक केली अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.