जनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने

183

पुणे : सामान्य माणसाला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्याशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. संपर्क ठेवल्याने चांगले संबंध प्रस्थापित होतात. संबंध आणि संपर्कातून चांगले संघटन निर्माण होते. या संघटनेतून जनसेवा होते. राजकीय जीवनात या चतुश्रुतीला महत्व आहे. असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या औंध- बोपोडी जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप संघटन सरचिटणीस राजेश पांडे, खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाच्या उपाध्यक्षा कार्तिकी हिवरकर,नगरसेवक प्रकाश ढोरे , सम्राट थोरात,किरण दगडे पाटील, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अमोल बालवडकर, गायत्री खडके,बाबू नायर, अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, माजी उपमहापौर सुरेश शेवाळे,भाजपा युवा अध्यक्ष बापू मानकर , कसबा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रमोद कोंढरे, कोथरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी,पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष महेश पुंडे,आरपीआयचे असित गांगुर्डे , आरपीआय मुस्लिम आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राफीक अहमद टफिदार, डॉ.अंबरीश दरक,भावना शेळके यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुनील माने यांच्या कडून अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची अर्ध्याहून कामे होतात. लोक दु:खी होऊन संपर्क कार्यालयात येतात मात्र संपर्क कार्यालयातून परत जाताना आनंदी होऊन गेली पाहिजेत. माणस जोडणे हा सुनील माने यांचा स्वभाव आहे. लोकांची सेवा करणे हा केंद्रबिंदू धरून ते गेली अनेक वर्ष काम करत आहेत. प्रत्यक्ष राजकारणात जरी त्यांनी आता प्रवेश केला असला तरी पडद्यामागे राहून ते सातत्याने जनसेवा करत आले आहेत. असे ही खासदार गिरीश बापट म्हणाले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, सुनील माने हे पूर्वाश्रमीचे पत्रकार होते त्यामुळे त्यांना सामाजिक प्रश्नाची उत्तम जाण आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय कामाकाजाची ही सर्वांगीण माहिती त्यांना आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून औंध बोपोडी भागात सर्वसामान्यांची व पक्षाची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील असा विश्वास आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या वर्षभरात सुनील माने यांनी भारतीय जनता पक्ष तसेच कॅटॅलिस्ट फाउंडेशन मार्फत अनेक समाजपयोगी कामे केली आहेत.सांगली कोल्हापूरला आलेल्या महापुरामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले, माने यांनी लोकांशी समन्वय साधून त्यांना जीवनावश्यक साहित्य पोहचवले. कोरोना काळात ही अनेक लोकांना त्यांनी विविध प्रकारे मदत केली. यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला राजकीय परिपक्व कार्यकर्ता मिळाला असल्याचे मत व्यक्त केले.

सुनील माने म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजपच्या शीर्ष नेतृत्वामुळे देशात अनेक सकारात्मक बदल झाले. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक विकासाची कामे झाली. पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी सुद्धा पुण्यात अनेक विकास कामे केली. जनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात प्रवेश करण्याचे ठरवले. पुढील काळात आपल्यापुढे पर्यावरण,वाहतूक, रोजगार यांसारख्या अनेक समस्या आहेत. त्यांना आपल्याला एकत्रित सामोरे जायचे आहे म्हणूनच लोकांची सेवा करण्यासाठी या संपर्क कार्यालयाची मुहूर्त मेढ रोवली आहे. माझ्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लक्ष्य अंत्योदय ठेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!