IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट – आमदार अतुल भातखळकर
IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट, लिहिली जात असून, 2009 मध्ये IFSC चा प्रस्ताव नाकारल्याबद्दल दोन्ही कॉंग्रेसने राज्याच्या जनतेची माफी मागावी. शिवसेनेच्या बोलभांड नेत्यांनी त्यांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी, जनता मूर्ख नाही असे म्हणत कांदिविली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आघाडीच्या नेत्यांना ट्वीट द्वारे प्रत्योत्तर दिले आहे..
IFSC च्या स्थलांतरावरून सध्या महाआघाडी विरुद्ध भाजप अस चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. सामान्य कोरोनाच्या संकटात असताना दोन्ही पक्षांमध्ये चालणारे हे शीत युद्ध कधी थांबवणार ? कोरोना नंतरच्या आर्थिक संकटांना आणि बेरोजगारीच्या प्रश्नांना कसे तोंड देणार? याकडेच सध्या शेतकरी, सामान्य जनतेचे आणि युवकांचे लक्ष लागले आहे.