अनुभव : कधी कधी काही फॅन खुपच लाजवतात..वसंत मोरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष, नगरसेवक आणि पुण्यात आपल्या कामाच्या वेगळ्या पद्धतीमुळे जनसामान्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलेले वसंत मोरे म्हणजेच तात्या सर्वांनाच परिचित आहे. तात्या लाईव्ह येणार म्हणजे काहीतरी कार्यक्रम असणार हे नक्की मग तो विकास कार्यक्रम असो व एखाद्या अन्याया विरोधात.

तात्यांचा फॅन क्लब खूप मोठा आहे संख्येने आणि क्षेत्रफळाने सुद्धा कारण फक्त पुण्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात वसंत मोरे यांचे चाहते आहेत आणि त्यामध्ये अनेक नेते देखील आहेत.
आजची सकाळ तात्यांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन आली. एखादा बॉलिवूड सेलिब्रेटी, आपला गुरु किंवा अत्यंत प्रिय व्यक्तीसाठी चाहाते काय करू शकतात हे आपण अनेक ठिकाणी पाहिलं आहे पण आपले फॅन काय करू शकतात याचा प्रत्यय नगरसेवक वसंत मोरे यांना आला. तात्यांच्या एका चाहत्याने त्यांना भेटीसाठी निमंत्रित केले असता त्यांना एक गमतीशीर अनुभव आला तो मोरे यांनी आपल्या शब्दात मांडला.
कधी कधी काही फॅन खुपच लाजवतात… असाच एका फॅन ने स्वागत केले त्याचीही खूप गम्मत झाली, मला नेहमी प्रमाणे एका कॉलनी मधे बोलावले मी ठीक वेळेत पोचलो, पण मागच्या बाजूने सगळे स्वागत करणारे उलटे उभे होते आणि मी मागच्या बाजूने गेलो…गल्ली समोर सगळे तुतारी ,झेंडे घेवुन ऊभे होते मला वाटलं की इकडे काही तरी पालखी येणार असेल म्हणून मी आलीकडच्याच गल्लीत घुसलो, जिथे जायचंय ते ठिकाण काही सापडेना निमंतत्रितांना फोन लावला आणि पत्ता विचारला तेव्हा समजले हा सगळा लवाजमा काय पालखीची नाही तर माझी वाट पहात होता…या असल्या स्वागताने मी मात्र पुरता भारावून गेलो… या शब्दात वसंत मोरेंनी आपला अनुभव शेअर केला.
आज माणूस माणसाला किंमत देत नसताना राजकारणापलीकडे जाऊन सामान्यांच्या कामी येऊन त्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात नगरसेवक वसंत मोरे यशस्वी झाले आहेत.
