सद्गुरु श्रीशंकर महाराजांच्या दर्शनाने नेहमीच एक वेगळी ऊर्जा लाभते – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यनगरीचे शक्तीपीठ, संतवर्य योगिराज, सद्गुरु श्रीशंकर महाराज यांचा 77 वा समाधी सोहळा बुधवारी संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत महाराजांच्या चरणी लीन होऊन प्रसाद सेवा करण्याचे पुण्य मिळविले.